पुणे: लग्नाचा (Pre-Wedding Skincare) दिवस हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो. या दिवशी वधूवर (Glow) सर्वांचे लक्ष असते. सध्या लग्नाचे समारंभ 4 ते 5 दिवस चालतात आणि या प्रत्येक दिवसासाठी मुलींचा पेहराव, ज्वेलरी, मेकअप आणि हेअर स्टाईल ठरलेली असते. ब्रायडल लूकसाठी मुली ₹ 18 ते 20 हजार रुपये खर्च करतात, पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. लग्नात सुंदर दिसण्यासाठी फक्त कपडे आणि मेकअप पुरेसा नाही, तर त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लग्नाच्या 15 दिवसांपूर्वी काही खास काळजी घेतल्यास त्वचा नैसर्गिकरित्या चमकण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती

सोपा घरगुती उपाय:
- 2 चमचे तांदळाचे पाणी घ्या.
- 1 चमचा कोरफडीचा (Aloe Vera) गर घ्या.
- 2 चमचे व्हिटॅमिन ई (Vitamin E) घ्या.
हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याची गुळगुळीत जेल बनवा आणि काचेच्या बाटलीत भरून ठेवा.
रात्रीचे खास रुटीन
रोज रात्री तोंड धुतल्यानंतर या जेलचे 2 थेंब चेहऱ्यावर लावा. हलक्या हातांनी त्वचेची मालिश (Massage) करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी तुमची त्वचा मऊ, चमकदार दिसेल आणि त्वचेवरील बारीक सुरकुत्या किंवा टॅन देखील कमी होईल. आपल्याला हा उपाय 15 दिवस नियमितपणे करायचा आहे.
- तांदळाचे पाणी: हे त्वचेसाठी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. यात व्हिटॅमिन बी, सी आणि ई असते, जे त्वचेला पोषण देऊन नैसर्गिक ग्लो मिळवून देते.
- कोरफडीचा गर: हा थंड असल्यामुळे त्वचेला आतून हायड्रेट करतो आणि त्वचा कोरडी राखण्यास मदत करतो. यात अँटीऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे मुरुमे आणि जळजळ कमी करतात.
- व्हिटॅमिन ई तेल: हे अँटिऑक्सिडेंट आहे, जे त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करते.
वधूने टाळाव्यात ‘या’ चुका
- पाणी प्या: लग्नाच्या धावपळीत शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी दिवसातून 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवे.
- आहार: आहारात व्हिटॅमिन सी असणाऱ्या पदार्थांचा (उदा. लिंबू, संत्री, किवी) समावेश करा. तेलकट आणि जंक फूडपासून दूर राहा.
- सनस्क्रीन: घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरा, ज्यामुळे त्वचा टॅन होणार नाही.
- तणाव कमी करा: लग्नाचे नियोजन करताना तणावाचा वाईट परिणाम चेहऱ्यावर होऊ शकतो, त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करा.
लग्नाच्या दिवसासाठी खास लूक हवा असेल, तर ब्युटिशियनच्या सल्ल्यासोबतच या नैसर्गिक टिप्सचा अवलंब करा.
(Disclaimer- या लेखात दिलेली माहिती ही केवळ सामान्य ज्ञान आणि घरगुती उपचारांवर आधारित आहे. ‘ब्रायडल ग्लो’ (Bridal Glow) मिळवण्यासाठी या उपायांचा अवलंब करण्यापूर्वी, कृपया तुमच्या त्वचेचा प्रकार (Skin Type) आणि संवेदनशीलता (Sensitivity) लक्षात घेऊन त्वचारोगतज्ज्ञ यांचा सल्ला अवश्य घ्यावा. या माहितीमुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी बातमीदार किंवा प्रकाशक जबाबदार असणार नाहीत.)







