Pune Prime News : सलग सुट्ट्या आल्या की अनेकजण फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. पण अनेकदा कुठं जावं हेच समजत नसतं. कारण, आपल्याला त्या ठिकाणाविषयी अधिक माहिती नसते. मात्र, भारतात अशी काही पर्यटनस्थळं आहेत ती एकदा पाहावीच. यातून निसर्गाचं खुललेलं सौंदर्य दिसतं.
हंपी हे एक प्रसिद्ध असे पर्यटनस्थळ आहे. हंपीला युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. येथील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक याठिकाणी येतात. इतकेच नाही तर येथील तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर सुद्धा तुम्हाला आनंद वाटेल. वर्षा जंगल हे देखील चांगलं पर्यटनस्थळ आहे. वेस्टर्न घाटात कर्नाटकातील वर्षा जंगलात अनेक वन्यजीव आहेत. हे एक परवडणारे पर्यटनस्थळ आहे. कारण, इथं कमी पैशात खाण्याची आणि राहण्याची व्यवस्था आहे.
याशिवाय, कलारीपयडू हे स्थळही पाहण्यासारखे आहे. कलारीपयट्टला जगात ‘मदर ऑफ मार्शल आर्ट्स’ म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात जुने डिफेंस आर्टफॉर्म यापैकी कलारीपयडू एक आहे. जगाची योग राजधानी म्हणून ऋषिकेश या ठिकाणाला ओळखले जाते. या ठिकाणी अनेक योगा स्कूल आहेत. इथं देखील अनेक निसर्गरम्य अशी ठिकाणं आहेत. त्यामुळे या ठिकाणीही जाण्याचा विचार तुम्ही करू शकता.