आपण सुंदर दिसावं असं अनेकांना वाटत असतं. त्यानुसार, काहीना काही प्रयत्न नक्की केले जातात. त्यात चेहऱ्यावरील पिंपल्स चिंतेचे कारण ठरू शकते. त्यामुळे ते कसे दूर करता येईल याकडे लक्ष दिले जाते. पण, यावर काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
त्यात लिंबाचा रस प्रभावी ठरू शकतो. लिंबूमध्ये नैसर्गिक ऍसिड असतात, जे मुरुम कोरडे करण्यास मदत करतात. ते थेट मुरुमांवर लावा. मात्र, लक्षात ठेवा की ते त्वचेला त्रास देऊ शकते. त्यामुळे ते अधिक संवेदनशील त्वचेवर लावू नका. लिंबू तुम्हाला सहन होईल तेवढंच लावा. मध आणि दालचिनी पेस्टही गुणकारी ठरू शकते. कारण, मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात आणि दालचिनी मुरुमांची जळजळ कमी करण्यास मदत करते. हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा आणि पिंपल्सवर लावा आणि रात्रभर राहू द्या.
कोरफड अर्थात ऍलोवेरा जेलही फायद्याचे ठरू शकते. जर उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरुम दिसत असतील, तर मुरुमांवर कोरफडीचे जेल लावा, रात्रभर राहू द्या आणि सकाळी धुवा. एलोवेरा चेहऱ्याला थंडावा देऊन मुरुमे कमी करतो. तसेच टी ट्री ऑईलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे मुरुमांना कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.