भारतात अनेक कंपन्यांमध्ये साधारणपणे 8-9 तासांची ड्युटी असते. असे असताना आता 90 तासांच्या कामाचा आठवड्याची चर्चा सुरु झाली आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत तेथील लोकं सर्वाधिक तास काम करतात. त्यामध्ये भूतान हा देश प्रथम क्रमांकावर येतो.
जभरातील सरासरी साप्ताहिक कामाचे तास 40-50 तासांच्या दरम्यान होतात. असे अनेक देश आहेत जेथे या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त तास काम केले जाते. मात्र, विशेषतः हाय इन्कम किंवा विकसित देशांमध्ये साप्ताहिक कामाचे तास कमी ठेवले जातात. अनेक देशांमध्ये आठवड्यातून चार दिवस काम केले जाते. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांना जास्त तास काम करायला लावल्यास त्यांना ओव्हरटाइम बक्षीस देण्याचीही तरतूद आहे. जरी 70 आणि 90 तासांच्या कामाचा आठवडा हा मुद्दा भारतात चर्चेचा विषय असला तरी, जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर, भारत आधीच जगातील सर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, आठवड्यात सर्वाधिक तास काम करणाऱ्या देशांमध्ये भूतान अव्वल स्थानावर आहे, जेथे आठवड्यात 54.4 तास काम केले जाते. याशिवाय UAE (50.9 तास), काओंगो (48.6 तास), कतार (48 तास) यांचा टॉप-10 यादीत समावेश आहे. भारताशिवाय बांगलादेश, पाकिस्तान आणि चीनसारखे देशही आहेत.