मुलं अनेकदा मोठी होत असताना हट्टीपणा करतात, उद्धट वागतात, रागीट होतात किंवा त्या उलट रडवी होतात. मुलं हट्टीपणा करायला लागले की नेमके काय करायचे हे पालकांना समजत नाही. मुलांचा हट्टीपणा काही प्रमाणात का होईना कमी होण्यासाठी तुम्ही पालक म्हणून त्यांना मारता,ओरडता किंवा त्यांच्या हट्टीपणाला कंटाळून महाग असली तरी ती गोष्ट देतात.
मुलांना चांगली शिस्त आणि सवयी लागाव्यात यासाठी काय करायला हवं हे अतिशय महत्त्वाचे आहे.
पर्याय द्या
त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केलात तर त्यांचा हट्ट कमी व्हायला नक्कीच मदत होईल. म्हणून त्यांचं मन वळवा. तुला एखादी गोष्ट मिळेल पण लगेच नाही, त्या ऐवजी तुम्ही त्यांच्यासाठी वेगळे काय करु शकता हे त्यांना सांगा.
मागेल ते लगेच मिळेल असे नका करू
अनेकदा कामाच्या गडबडीत आपण छोटी मोठी कामे आपण मुलांना सांगतो, आणि म्हणतो तू हे काम केलस तर मी तुला अमुक गोष्ट देईन. अशावेळी नकळत आपण त्यांना आमिश दाखवत असतो. परिणामी त्यांना समोरच्याचे ऐकल्यावर काहीतरी मिळते अशी सवय लागते.
हट्ट पुरवायला मर्याद ठेवा
मुलाचे कोणते हट्ट पुरवायचे आणि कधी याला काही मर्यादा घालून घ्या. बऱ्याचदा आपल्या लहानपणी आपल्याला मिळाले नाही म्हणून आपल्या मुलाला त्याने सांगितले की लगेच द्यायला हवं यावंर थोडं नियंत्रण ठेवा.
जबरदस्ती करु नका
जर तुम्ही तुमच्या मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करत असाल तर त्यांचा स्वभाव बंडखोरी होऊन जातो. किंबहूना ते मार मिळाला तरी घाबरत नाहीत. ते त्यांच्या भविष्यासाठी घातक ठरू शकते. हीच सवय त्यांना पुढे जाऊन वाईट बनवू शकते.
तुमच्यातील संवांद महत्त्वाचा
पालक आणि मुलं यांच्यामध्ये संवांद असणे फार महत्त्वाचे आहे. अशावेळी जरी मुलाने काही गोष्टींसाठी हट्टीपणा केला, तर त्यावेळी गोडबोलून त्या गोष्टीपासून त्याला दूर ठेवा. बोलण्यात गुंतवूण ठेवल्यास काहीवेळा मुलं ती गोष्ट विसरूण जातं. जर पालक किंवा घरातील कोणतीही गोष्ट मागितली तर लगेच आणून देऊ नका.