नवी दिल्ली : आधार कार्ड हे आपण भारतीय नागरिक असल्याचे ओळखपत्र बनले आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड हे गरजेचे बनले आहे. पण, हे आधार कार्ड अपडेट करणं आत्तापर्यंत मोफत होतं. मात्र, यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. असे जरी असले तरी मोफत आधार अपडेटसाठी 4 दिवस उरले आहेत.
‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ अर्थात UIDAI ने मोफत आधार अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली होती, जी अगदी जवळ आहे. UIDAI ने 10 वर्षांपूर्वी केलेल्या आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. अशा स्थितीत ती आणखी पुढे जाण्याची शक्यता कमीच दिसत आहे. यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम त्वरित पूर्ण करावे.
यापूर्वी 14 मार्च ते 14 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आणि नंतर ही अंतिम तारीख पुन्हा एकदा 14 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. यानंतर, आणखी बदल करत आधारकार्डधारकांना हे काम तीन महिन्यांसाठी म्हणजे 14 डिसेंबरपर्यंत पूर्णपणे मोफत करण्याची सुविधा देण्यात आली आहे. मात्र, आता या तारखेनंतर जर तुम्ही आधारकार्ड अपडेट करणार असाल तर तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.