जगात अशी काही ठिकाणं आहेत ती त्यांच्या विशेष पद्धतीमुळे ओळखले जातात. मग ते परंपरा असो किंवा अन्य काही. त्यात ब्रिटनमध्ये असं एक गाव आहे तिथं लोकं कपड्यांशिवाय राहतात. मग ते पुरुष असो वा महिला. कोणीही तिथं कपडे घालतच नाही. होय, असे हे ठिकाण आहे.
तुम्हाला आम्ही अशाच एका अनोख्या गावाविषयी सांगणार आहोत, जिथे लोकांनी शतकानुशतके कपडे घालण्याची परंपरा सोडली आहे. या गावातील लोक आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत आहेत आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. परंतु तरीही ते कपड्यांशिवाय आनंदी राहतात. या मागचे कारण असं आहे की, 1929 मध्ये इस्युल्ट रिचर्डसन नावाच्या व्यक्तीने या गावाचा शोध लावला. त्याला ही जागा इतकी आवडली की त्याने इथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. आज या गावात एक पब, स्विमिंग पूल आणि क्लब देखील आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गावातील नियम पाळावे लागतात.
ब्रिटनस्थित हर्टफोर्डशायर येथील स्पीलप्लाट्सज असे या गावाचे नाव आहे. विशेष म्हणजे खेड्यातील लोक शहरात गेल्यावर कपडे घालतात, पण गावात परत येताच ते नैसर्गिक स्थितीत परततात. ते हिवाळ्याच्या हंगामात किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी कपडे घालू शकतात. या गावातील लोक ही अनोखी जीवनशैली अतिशय आरामात जगतात आणि त्यांना याबद्दल कोणतीही खंतही त्यांना नाही.