मुंबई : डिसेंबर महिना सुरू झाला की, आपल्याला नवीन वर्षाचे वेध लागते. ख्रिसमस, नवीन वर्षात सगळीकडे पार्टीचेच वातावरण असते. यंदा सर्वच सणांवर आणि समारंभांवर कोरोनाचे सावट असले तरी पुरेशी काळजी घेऊन आपण एन्जॉय करू शकतो. या दिवसात बाहेर जाताना कपडे नेमके कसे असावेत हे अनेकांना माहिती नसते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…
नवीन वर्षासाठी कपडे घेताना विशेष लक्ष द्यावे लागते. ट्रेंडी वेस्टर्न आउटफिट्स छान दिसतात. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होताना नव्या कपड्यांची खरेदी करण्याचा विचार मनात असेल तर या पर्यायांचा विचार करता येईल. ख्रिसमस किंवा न्यू ईअर पार्टीला कॅज्युअल वेअर कॅरी करायचे असतील तर जीन्स आणि शर्ट हा खूप चांगला ऑप्शन आहे. त्यात सॅटिन शर्ट आणि काळ्या रंगाच्या जीन्समध्ये आपण छान दिसाल. नाताळ, नववर्षाला लाल रंगाचे कपडे घालण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे तुम्हाला जर लाल रंग आवडत नसेल तर मरून रंगाचा ड्रेसही ट्राय करता येईल.
पण, जीन्ससोबतच वेगवेगळ्या पँट्सही उपलब्ध असतात. त्यामुळे या पँटवर टॉपही घालू शकता. सेमी फॉर्मल ड्रेस कोड असल्यास मॅक्सी ड्रेस ट्राय करता येऊ शकतो. नी लेंग्थ किंवा पायघोळ मॅक्सी ड्रेसही उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या शिमरी ड्रेसचा ट्रेंड आहे. बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्री शिमरी ड्रेस घालताना दिसतात. तुम्हीही झगमता ड्रेस घालू शकता.