नोकरी असो वा शिक्षण किंवा इतर काही कारणे घर सोडून अनेकजण बाहेर राहतात. मग अनेकदा वसतिगृह अर्थात हॉस्टेलचा पर्याय निवडला जातो. याच हॉस्टेलमध्ये राहताना अनेक मित्र-मैत्रिणी देखील होतात. तेव्हा आपण आपलं मानून बऱ्याचदा खासगी आयुष्यातील काही गोष्टीही सांगतो. पण थांबा तुमचं हे करणं नंतर धोकादायक ठरू शकतं.
काही अशा गोष्टी आहेत त्या आपल्या हॉस्टेलच्या पार्टनरसोबत शेअर न करणेच फायद्याचे ठरू शकते. त्यामध्ये तुमची कौटुंबिक समस्या कधीही कोणालाच शेअर करू नका. तुम्ही त्यांना तुमच्या स्वतःच्या कुटुंबातील समस्यांबद्दल सांगू नका. कारण कौटुंबिक समस्या सार्वजनिक होण्याचा धोका असू शकतो. ज्याला चांगले मानले जाऊ शकत नाही. तसेच तुमची आर्थिक स्थिती, पालकांकडून मिळालेला पॉकेटमनी किंवा इतर कोणतीही आर्थिक समस्या तुमच्या मित्रांना सांगणे टाळाच. कारण, नंतर तेच तुम्हाला अडचणीचं ठरू शकतं.
कधी-कधी या अशा गोष्टींचा गैरफायदाही घेतला जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यापासून थोडं दूर राहिलेलंच बरं. हॉस्टेलमध्ये राहून तुमच्या ‘लव्ह लाईफ’ किंवा ‘रिलेशनशिप’ची माहिती शेअर करणे हा मोठा धोका असू शकतो. ही माहिती चर्चेचे कारण ठरू शकतं. याचा केवळ तुमच्या इमेजवरच नकारात्मक परिणाम होत नाही, तर तुमचे नातेसंबंधही धोक्यात येऊ शकते.