पुणे प्राईम न्यूज डेस्क: सलग सुट्ट्या आल्या की कुठंतरी फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो. पण ग्रुप टूरला जाण्याची एक वेगळीच मज्जा असते. यासाठी अनेक प्लॅनिंग केले जाते. पण कितीही प्लॅनिंग केले तरी अचानक काहीतरी समस्या या उद्भवतातच. काही समस्यांवर तर अचानकपणे तोडगाही निघत नाही. म्हणूनच काय करावं हे समजत नाही. मात्र, काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्की फायदा होऊ शकतो.
तुम्ही ग्रुप टूरला जाता तेव्हा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. ग्रुप टूरला जाण्याआधी तुम्हाला हॉटेल बुकिंग करणे गरजेचे आहे. त्यासोबतच तुम्ही कोणत्या वाहनांनी जाणार आहात त्यांची वेळ अशा अनेक गोष्टी आधीच लक्षात असणे गरजेचे आहे. अनेकदा ग्रुप टूरमध्ये सवलतही मिळते. जेव्हा तुम्ही ग्रुप टूरला जाता तेव्हा कोणीही कसाही खर्च करतो आणि टूरचे बजेट बिघडते. नंतर पैशांचा हिशेब ठेवणे कठीण होऊन जाते. त्यामुळे टूरला जाताना ग्रुपमधील कोणी एकाने तरी खर्चाचा हिशेब ठेवणे आवश्यक आहे.
ग्रुप टूर दरम्यान एकमेकांशी संवाद असणे गरजेचे आहे. कारण अशाने मिस कम्युनिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. यासाठी तुम्ही संवादासाठी, संपर्कासाठी खास त्या टूरसाठी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करू शकता. ज्याने तुम्हाला ट्रॅव्हल्सही संबधित काही गोष्टी असतील त्या एकेमकांशी बोलता येतील. अशा काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.