2024 हे वर्ष सुरु होऊन अवघे दोन महिने होत आलेत. पण या दोन महिन्यातंच मुलींच्या काही नावांना खूप चांगली पसंती मिळाली आहे. 2024 मधील मुलींची युनिक आणि ट्रेंडी मुलींच्या नावांची यादी आम्ही येथे शेअर करत आहोत. कारण या नावांमध्ये ट्रेंड आणि वेगळेपण असं दोन्ही आहे. तसेच या नावांचा अर्थ देखील खास आहे.
द्विता
‘द्विता’ हे नाव अतिशय दैवी आहे. या नावाचा अर्थ आहे दोन स्वरुप, दोन वेगवेगळ्या रुपात दिसणारे. दोन अक्षरी असं हे नाव मुलीसाठी नक्कीच निवडू शकता. या नावाचा शुभांक हा 2 आहे. मीन राशीचं हे नाव तुमच्या चिमुकलीसाठी ठरेल लक्की.
ध्यान
‘ध्यान’ हे नाव देखील अतिशय आध्यात्मिक आहे. मुलीवर उत्तम संस्कार घडावेत असं वाटत असेल तर या नावाचा विचार करायलाच काही हरकत नाही. ‘ध्यान’ म्हणजे मेडिटेशन, देवाशी एकाग्र होणे. या नावाचा विचार करावा.
जीवा
‘जीवा’ हे देखील अतिशय युनिक आहे. ‘जीवा’ हे मुलींचे हिंदू नाव आहे ज्याचा अर्थ “जीवन” किंवा “अमर” आहे. या नावाचा नक्की विचार करा. जीवन, अमर, जिवंत असण्याचा अनुभव असा देखील या नावाचा अर्थ आहे.
यशिका
“यशिका’ हे एक हिंदू-भारतीय स्त्रीलिंगी नाव आहे ज्याचा अर्थ “यश मिळवणारी” किंवा “जो प्रसिद्ध आहे” असा अर्थ लावला जाऊ शकतो. हे “यश” नावाचे स्त्रीलिंगी रूप आहे, ज्याचा अर्थ “यश” आणि “प्रसिद्धी” आहे. मुलीसाठी हे नाव निवडू शकता.
इशिका
‘इशिका’ हे नाव भारतीय संस्कृतीमधील नाव आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा विचार करणाऱ्यांसाठी हे नाव खास ठरेल. या नावाचा देखील अर्थ वेगवेगळा आहे. बाण, जो साध्य करतो, रंगाचा ब्रश आणि देवाची मुलगी असा या नावाचा अर्थ आहे.
दीतिक्षा
‘दीतिक्षा’ हे नाव देखील भारतीय नावांमधील अतिशय युनिक नाव आहे. या नावाचा अर्थ आहे दीक्षा, त्याग, समारंभाची तयारी, जो दीक्षा घेतो, तो स्वावलंबी. मुलीसाठी या अर्थांनी परिपूर्ण असलेलं नाव नक्की निवडा.
नितिशा
‘नितिशा’ या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. ‘नितिशा’ हे जुनं नाव असले तरीही 2024 मध्ये अतिशय ट्रेंडी आहे. ‘नितीशा’ म्हणजे “अर्धनारीश्वर,” “न्यायाची देवी,” किंवा “देवीचे नाव”. हे नाव विशेष महत्त्व आहे कारण त्याचा अर्थ खूप चांगला मानला जातो.
इवान्या
देव दयाळू आहे. ‘इवान्या’ हे स्लाव्हिक, झेक आणि हिब्रू मूळचे स्त्रीलिंगी नाव आहे. तुम्ही तुमची मुलगी दयाळू देवाची देणगी वाटत असेल तर या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. मुलीसाठी या नावाची नक्की निवड करा.
चंद्रिया
‘चंद्रिया’ हे नाव अतिशय युनिक आहे. या नावाचा मुलीच्या नावासाठी विचार करायला काहीच हरकत नाही. ‘चंद्रिया’ म्हणजे चमकणारा चंद्र असा या नावाचा अर्थ आहे. मुलीच्या जीवनात चंद्राची शितलता अपेक्षित असेल तर या नावाचा नक्कीच विचार करा.
समिहा
‘समिहा’ हे नाव वेगवेगळ्या अर्थांनी परिपूर्ण असं आहे. अरबीमध्ये ‘समिहा’ म्हणजे “उत्तम” किंवा “प्रशंसा” असा होतो. तर हिंदू धर्मात ‘समिहा’ नावाचा अर्थ म्हणजे “उदार” आणि दयाळू स्त्री”. संस्कृतमध्येही ‘समिहा’ म्हणजे “इच्छा आणि तळमळ. इतक्या वेगवेगळ्या भाषेत खास अर्थ असताना मुलीसाठी हे नाव निवडायला काहीच हरकत नाही.
रुमी
‘रुमी’ हे नाव अतिशय सुफियाना वाटते. देवाशी थेट संबंध जोडायचा असेल तर या नावाचा नक्की विचार करा. लॅटीन भाषेतील हे नाव ज्याचा अर्थ आहे समुद्राचे दव तसेच प्रशंसा, उंची असाही या नावाचा अर्थ आहे.
प्रसा
‘प्रसा’ हे नाव अतिशय युनिक आहे. या नावाचा अर्थ आहे उत्कट इच्छा. तसेच या नावाचा अर्थ आहे ‘कोमल’ आणि ‘सौम्य’. अतिशय युनिक असं हे नाव 2024मध्ये अतिशय ट्रेंडी आहे. या नावांचा विचार मुलीच्या नावांसाठी नक्की करा.