गाणं अर्थात संगीत ऐकणं अनेकांना मनाला आनंद देणारे असू शकते. त्यामुळेच म्युझिक थेरपी हे आता प्रसिद्ध होताना दिसत आहे. म्युझिक थेरपी ज्येष्ठांना आराम देण्यास मदत करतेच. शिवाय, विशिष्ट थीम, गाणे, वाद्ये आणि ताल असलेली गाणी लावल्याने हृदयाची गती प्रमाणित राहते.
वृद्धांसाठी म्युझिक थेरपीमध्ये शब्द, ताल आणि सूचनांचा समावेश असू शकतो. त्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. मनाला देखील शांती मिळते. म्युझिक थेरपीमुळे वृद्धांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ मिळू शकतात. उत्साही संगीत आणि आनंददायी गाण्यामुळे नैराश्य आणि भीती यांपासून दूर राहता येऊ शकतं. ही गाणी ऐकल्याने तणावापासून आराम मिळतो. जेव्हा एखादी व्यक्ती व्यस्त राहते आणि संगीताचा आनंद घेते तेव्हा नैराश्य विसरले जाऊ शकते.
म्युझिक थेरपीचे अनेक फायदे आहेत. जे लोक बोलू शकत नाहीत, त्यांना गुनगुन किंवा हात हलवून त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. काही म्युझिक थेरपी क्रियाकलापांमध्ये हालचाल समाविष्ट असते. यामध्ये टाळ्या वाजवण्यापासून हातपाय हलवण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. याने मनाला शांती तर मिळतेच शिवाय आपलं मन जर नैराश्येत असेल तर ते विचलित होऊन इतरत्र वळवण्यासही मदत मिळते.