LifeStyle : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे छत्री, रेनकोटसह वेगवेगळ्या प्रकारचे सँडल्स, चप्पल वापरण्याला प्राधान्य दिलं जातं. पण यापूर्वी आपण रेग्युलर काळ्या रंगाची छत्री वापरली असेल. मात्र, आता विविध प्रकारच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. हा देखील सीजनमधला एक ट्रेंडच आहे.
सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या आकारात आणि स्टाईलमध्ये छत्र्या उपलब्ध आहेत. यामध्ये मॅजिक छत्री आणि टेन्ट छत्री, चेरी ब्लॉसम छत्री या छत्र्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यात चेरी बहर ही छत्री साधारणत: 200-250 रुपयांपर्यंत मिळू शकते. या छत्र्या सध्या ग्राहकांचं लक्ष घेत आहेत. तरुणींमध्ये या छत्रीची विशेष क्रेझ आहे. ट्रान्सपरंट असलेल्या या छत्रीच्या मध्यभागावर लहान लहान फुलांची डिझाईन करण्यात आली आहे. ही छत्री सध्या ट्रेंडमध्ये असून, तिची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.
उन्हाळा किंवा पावसाळा अशा कोणत्याही ऋतूमध्ये सहज वापरता येईल अशी ही छत्री म्हणजे प्लेन छत्री. एकाच रंगाचं कापड वापरुन ही छत्री तयार करण्यात येते. या छत्रीची किंमत 250 पासून सुरु होते. यात विविध रंग उपलब्ध असतात. या छत्रीचा वापर अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण करतात.
याशिवाय, डिजिटल प्रिंट हा देखील एक उत्तम पर्याय झाला आहे. या छत्र्यांमध्ये प्रिंट केलेलं काम आपल्याला पाहिला मिळते. सध्या बाजारात डिजिटल प्रिंटच्या छत्र्यांची मागणी वाढत आहे. वेगवेगळे मेसेज किंवा चित्र या छत्रीवर रेखाटण्यात येतात. तरुण वर्गामधून या छत्रीला जास्त पसंती देण्यात येत आहे. यांसह इतरही काही छत्रा आपल्याला बाजारात पाहिला मिळतात.