Lifestyle : स्मरणशक्ती कमी झाल्याची समस्या अनेकांना जाणवते. मग ते वयानुसार असो की अगदी तरूणांमध्येही अशी समस्या दिसून येते. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
डाळिंबाचा ज्यूस मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप आरोग्यदायी आहे. यामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते जे स्मरणशक्ती वाढवते. हा ज्यूस नियमितपणे प्यायल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूची क्रिया सुधारते. हा ज्यूस फक्त मेंदू नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. तसेच ‘व्हिटॅमिन सी’ने परिपूर्ण पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ब्लूबेरीचा ज्यूस पिऊन तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता. या फळाला ब्रेन बेरी देखील म्हणतात. त्यात फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात जे आपली मेमरी आणि कॉग्निटिव फंक्शन चांगले करतात.
जर तुम्ही संत्र्याचा ज्यूस पित असाल तर तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारू शकते. न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. याशिवाय ब्रेन फॉगची समस्याही दूर होऊ शकते. संत्र्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट मेंदूला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात.