LifeStyle : सोने-चांदीमध्ये महिलांसह पुरुषांना देखील आवड निर्माण होताना दिसत आहे. त्यातच काही महिला अशा देखील आहेत त्यांना प्रत्येक साडी, ड्रेससोबत वेगळ्या प्रकारचे दागिने घालणे आवडते. दागिन्यांकडे विशेष लक्ष नाही दिलं तर ते वेळेनुसार काळे पडतात. त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने घरबसल्या चकचकीत करू शकता.
दागिन्यांची चकाकी तशीच ठेवायची असल्यास, क्लोरीनच्या पाण्यापासून याला दूर ठेवावे लागेल. जर आपण स्विमिंग पुलात जात असाल किंवा घराचे काम जसे की भांडे घासणे, कपडे धुणे यासारखे काम अंगठी घालून करत असाल, तर ती हळू हळू काळी पडते. तसेच जर आपण ऑक्सिडाईझ केलेले दागिने घातलेले असल्यास तर क्लोरीनचे पाणी हानिकारक ठरू शकते.
दागिन्यांना कोमट पाण्यात साबणाचा घोळ बनवून या घोळाने स्वच्छ करू शकता. या व्यतिरिक्त मिठाचे टूथपेस्ट देखील आपण लावू शकता. पण लक्षात असू द्या की हे दागिने हळुवार हाताने स्वच्छ करायचे असतात.
नेहमी मेकअप आधी करा. नंतर दागिने घाला. बऱ्याच महिला दागिने घालूनच मेकअप करतात असे केल्यास त्याच्यावर हळूहळू मेकअप जमू लागते आणि दागिन्यांची चकाकी कमी होऊ लागते. म्हणून हे लक्षात ठेवावे की, मेकअप करताना दागिने घालू नये.