पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या थंडीचा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. तसेच लग्नसराईचे दिवसही याच काळात सुरु होतात. अशा परिस्थितीत महिलांना या ऋतूमध्ये मेकअप करण्याची एकप्रकारे संधीच मिळते. पण, या ऋतूमध्ये चेहऱ्यावर अनेक बदल होतात, त्याचा प्रभाव मेकअपवर दिसून येतो.
खरं तर, हिवाळ्यात मेकअप करताना जराही निष्काळजीपणा करणे चेहऱ्यासाठी हानीकारक ठरू शकतं. चेहऱ्यावर उकल्यासारखं दिसू शकतं. म्हणून चेहरा सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसू लागतो. हिवाळ्यात चकचकीत मेकअप उत्पादनांना नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. जर तुम्ही मॅट उत्पादने वापरत असाल तर तुमची त्वचा कोरडी दिसू लागेल. तसेच जर तुम्ही हिवाळ्यात मॅट लिपस्टिक लावली तर काही वेळाने तुमचे ओठ कोरडे होऊ लागतात. अशा परिस्थितीत लिपस्टिक वापरण्यापूर्वी लिप बाम वापरावा.
याशिवाय, हिवाळ्यात मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याची मालिश करावी. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारेल. मसाजसाठी बोटांच्या मदतीने चेहऱ्याला साधारण दोन मिनिटे मसाज करा. यानंतर तुमची त्वचा मऊ होईल. तुमचा चेहरा सुंदर बनवण्यासाठी हिवाळ्यातही लिक्विड इल्युमिनेटर वापरायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास फाऊंडेशनमध्ये लिक्विड इल्युमिनेटर मिसळून लावू शकता, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल आणि त्वचा मुलायम राहील.