मदर्स डे अर्थात मातृदिन हा आपल्या आईप्रति प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी हा दिवस 11 मे ला साजरा केला जाणार आहे. ‘मदर्स डे’ला तुम्ही तुमच्या आईला अशी भेट देऊ शकता जी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणेल आणि तिचे मन आनंदी करेल.
मध्यमवर्गीय कुटुंबात, पालकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची संधी क्वचितच मिळते. कधीकधी कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या इच्छा दाबाव्या लागतात. तर कधीकधी मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. काही माता अशाही आहेत त्यांना स्वतःसाठी साडीही खरेदी करता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या आईला तिच्या आवडीचा कोणताही ड्रेस किंवा साडी घेऊन देऊ शकता. तसेच आपण अनेकदा आपल्या जवळच्या लोकांसमोर आपले मन मोकळे करण्यात किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यात कमी पडतो.
आपण आपल्या आईवर किती प्रेम करतो हे कधीच त्यांना कळू देत नाही. पण, ‘मदर्स डे’ म्हणजे तुमच्या भावना व्यक्त करण्याची एक उत्तम संधी होय. यावेळी तुम्ही तुमच्या आईसाठी एक प्रेमळ पत्र किंवा कविता देखील लिहू शकता. तुमच्या आईला स्वयंपाकाची आवड असेल, तिला स्पा घेणे किंवा ब्युटी ट्रीटमेंट घेणे आवडते, तर तुम्ही तिला या संबंधित भेटवस्तू देऊ शकता. तुमच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंदी होईल आणि त्याची इच्छाही पूर्ण होईल.