महिला असो वा पुरुष व्यायाम हा महत्त्वाचा असतो. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यायाम खूप फायदेशीर आहे. पुरुष मुख्यतः वेट ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करतात तर स्त्रिया मुख्यतः कार्डिओ, योग आणि झुंबा यांसारख्या एरोबिक गोष्टींकडे लक्ष देतात.
महिलांसाठी वेट ट्रेनिंग हे फायद्याचे असल्याचे सिद्ध झाले आहे. सुरुवातीला हलके वजन घेऊन प्रशिक्षण सुरू करावे लागेल आणि नंतर मध्यम वजनाने उचलावे लागेल. वजन उचलल्याने हाडांची घनता वाढते, ज्यामुळे चयापचय देखील वाढते. त्यामुळे अधिक कॅलरीज बर्न करण्यात मदत करते ज्यामुळे तुम्ही फक्त स्लिम बनत नाही तर तुमचे शरीर टोन देखील ठेवते.
वाढत्या वयाबरोबर शरीरातील स्नायूंचे प्रमाणही कमी होऊ लागते. वेट ट्रेनिंगमुळे स्नायूंमध्ये बळकटी येते. यामुळे तुमचे हाडांचे सांधे मजबूत होतात. कारण स्नायू त्यांना आधार देतात. याशिवाय वेट ट्रेनिंग नीट केले तर दुखापतीचा धोकाही कमी होतो. त्यामुळे महिलांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष देणे आता गरज बनली आहे.