आपण इतरांपेक्षा चांगलं दिसावं असा प्रयत्न अनेक स्त्रियांचा असतो. त्यासाठी तऱ्हे-तऱ्हेचे उपाय केले जातात. सौंदर्य प्रसाधने अर्थात ब्युटी क्रीमस् वापरल्या जातात. कपड्यांसोबतच बांगड्या घालण्यालाही प्राधान्य दिलं जातं. मात्र, याच बांगड्या घालताना काही मुली, महिलांना त्रास होतो. पण आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत त्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो.
व्हेजिटेबल प्लास्टिक हेदेखील एक माध्यम आहे. या प्लास्टिकने आपले हात पूर्णपणे स्वच्छ करा. यामुळे तुम्हाला प्रक्रियेत कोणताही त्रास होणार नाही. तुमचे तळवे रात्रभर प्लास्टिकमध्ये चांगले झाकून ठेवल्यानंतर बांगड्या घालणे सोपे होईल. एक-एक करून बांगड्या घाला. अशा प्रकारे तुम्ही खूप लवकर बांगड्या घालू शकाल.
जर तुम्हाला बांगड्या घालताना त्रास होत असेल तर प्लास्टिक ग्लोजचा वापर करावा. या प्लास्टिक ग्लोजच्या मदतीने तुम्ही तुमच्या हातात बांगड्या सहज घालू शकता. हातात प्लास्टिक ग्लोज लावा. नंतर घट्ट बांगडी मनगटात गोलाकार हालचालीत फिरवा. अंगठ्याचे हाड ओलांडले की बांगडी मनगटावर आणणे सोपे जाते. यानंतर हातमोजे काढून टाका. या पद्धतीने तुम्ही काचेच्या आणि धातूच्या दोन्ही बांगड्या अगदी सहजरित्या घालू शकता.