पुणे प्राईम न्यूज डेस्क: मेकअप करताना महिला वर्ग विशेष अशी काळजी घेताना दिसतात. पण काही काळजी घेऊनही अनेकदा मेकअप खराब होतो. त्यामुळे निराशा देखील होते. मात्र, आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत त्या फॉलो केल्यास नुकसान होणार नाही. त्यासाठी मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फाचा वापर करा.
बर्फ हा थंड असल्यामुळे त्यातील आर्द्रतेमुळे तुम्हाला घाम येणार नाही आणि तुमचा मेकअप बराच काळ सहज टिकेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चेहऱ्यावर खूप थंड पाणी देखील वापरू शकता. याचाही तुम्हाला फायदा होईल. तुमची आयशॅडो, मस्करा, आयलायनर आणि काजल हे वॉटरप्रूफ असावेत, याकडेही लक्ष द्या. जर ते वॉटरप्रूफ नसेल तर पावसामुळे त्याचा लूक खराब होऊ शकतो. या ऋतूत फक्त जेल आधारित डोळ्यांचा मेकअप वापरण्याचा प्रयत्न करा.
तसेच तुमची लिपस्टिक खराब होऊ नये असे वाटत असेल तर क्रीमी किंवा ग्लॉसी लिपस्टिकऐवजी चांगल्या दर्जाची मॅट लिपस्टिक वापरा. यामुळे तुमचे ओठ जास्त कोरडे होणार नाहीत. मॅट लिपस्टिक चांगल्या दर्जाची असेल तरच ती पावसात टिकते. याशिवाय, तुम्ही जरी कमी प्रमाणात फेशियल बेस तयार केला तरी तुमचा लूक परफेक्ट राहील आणि पावसात ओला झाला तरी मेकअप खराब होणार नाही.