पुणे : आपल्या निसर्गातील अनेक अशा गोष्टी आहेत, त्या एकप्रकारे विशेष अशा आहेत. त्याचे अनेक फायदेही आहेत. त्यातच गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांसाठी गूळ हा उत्तम पर्याय आहे. पांढऱ्या किंवा तपकिरी साखरेपेक्षा गुळात गोडपणा कमी असतो आणि त्याचे पौष्टिक मूल्यही जास्त असते.
गुळामध्ये असलेले पोषकतत्व अनेक आरोग्य समस्यांवर फायदेशीर असतात. या गुळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असे अनेक पोषक घटक गुळात असतात. हे नैसर्गिक क्लिन्सर म्हणून काम करते, हे चेहऱ्यावरील डाग कमी करते. याशिवाय, गूळ हृदय, यकृत आणि पचनाच्या समस्यांमध्ये गूळ खाणे फायदेशीर आहे. पण गूळ केवळ आपल्या आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
जर तुम्ही मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही हा फेस पॅक वापरून पाहू शकता. हे करण्यासाठी गूळ पावडरमध्ये टोमॅटोचा रस मिसळा, नंतर चांगले फेटून घ्या. हा पॅक चेहऱ्यावर लावा, काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा, असे केल्यास फायद्याचे ठरू शकते.