पुणे प्राईम न्यूज डेस्क: पालेभाज्या, हिरव्या भाज्या खाव्यात असे आपण अनेकदा ऐकले असेल. हे जरी खरे असले तरी सध्याच्या या पावसाळ्याच्या वातावरणात तुम्ही हिरव्या भाज्या घेत असाल तर थोडी काळजी घ्यावी. कारण, याने फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची शक्यता जास्त असते.
भाज्या हिरव्या आणि चमकदार भासवण्यासाठी रंग भरलेल्या इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे. पावसाळ्यात जर तुम्हाला हिरव्या पालेभाज्या खायच्याच असतील तर त्यांना मीठ किंवा लोणी लावून नंतर पाण्याने धुवून खाव्यात. याशिवाय, पावसाळ्यात उघड्या डोळ्यांनी न दिसणारे अनेक प्रकारचे कीटाणू आणि किडे त्यावर असतात. पावसाळ्यात कोबी, फुलकोबी आणि काष्टक यामध्ये उघड्या डोळ्यांनी न पाहता येणारे विषाणू असतात. त्यामुळे या भाज्या खाण्यामुळे पोटदुखी आणि इतर संबंधित समस्या वाढू शकतात.
रस्त्यावरील हिरव्या पालेभाज्यांनी बनलेले पदार्थ खाऊ नका. कारण, त्या भाज्या चांगल्याप्रकारे धुतल्या जात नाहीत. त्यामुळे पोटात बॅक्टेरिया गेल्याने इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे अपचन, जंत, ताप येऊ शकतो. पावसाळ्यात या भाज्या धुवूनही त्याची घाण बाहेर पडत नाही. त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.