पुणे प्राईम न्यूज डेस्क: पती-पत्नीचे नातं हे विश्वासाचे, समजूतदारपणाचे असते तर काही प्रसंगी नाजूकही बनते. त्यामुळे याकडे वेळीच लक्ष द्यावे. नाहीतर हा विषय टोकाला जाऊन घटस्फोटापर्यंत जाऊ शकतो. पण, अशा काही गोष्टी आहेत, त्याकडे विशेष लक्ष दिल्यास फायद्याचे ठरू शकते. परिणामी, नाते आणखी घट्ट राहू शकते.
जोपर्यंत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आणि लिव्ह-इन रिलेशनशिपची संस्कृती चालू राहील, तोपर्यंत घटस्फोट होतच राहतील, असे अनेकांचे म्हणणे आहे. संवादाची कमतरता हे घटस्फोटाचे सामान्य कारण आहे. जर तुम्ही जोडीदाराबरोबर संवाद साधणे बंद केले तर तुम्ही एकमेकांशी जुळून राहू शकत नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद खूप जास्त आवश्यक आहे. याशिवाय, अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे मनाप्रमाणे सर्व गरजा पूर्ण होत नाही आणि यामुळेसुद्धा घटस्फोट होऊ शकतो.
घरात जर आर्थिक तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेकदा कुटुंब चालवणे कठीण जाते. अशावेळी जोडीदार वैतागून सोडून जाऊ शकतो. कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असणे खूप जास्त गरजेचे आहे. जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर नातं तुटण्याच्या मार्गावर येऊ शकते. त्यामुळे नात्यात विश्वास असेल असे पाहावे. ज्याने पुढील गोष्टी टाळता येऊ शकतात.