पुणे प्राईम न्यूज डेस्क: मुलगा किंवा मुलगी वयात आली की पालकांकडून लग्न लावून दिले जाते. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार हा चांगलाच असावा असे मुलगा असो वा मुलगी दोघांनाही वाटत असतेच. मात्र, लग्न करण्यापूर्वी आपल्या भावी पती अथवा पत्नीविषयी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. तसे केल्यास भावी जीवनात चांगला फायदा होऊ शकतो. अन्यथा नातं बिघडायला वेळ लागत नाही.
काही लोक मोठंमोठ्या गप्पा मारतात. पहिल्या भेटीत छाप पाडण्यासाठी बढाई मारतात. अशावेळी भावी जीवनसाथीच्या बुद्धिमत्तेकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्ही किती शिक्षित आहात किंवा तुमची शैक्षणिक पात्रता आणि नोकरी याकडे लक्ष द्यायला हवे. तुमचा जोडीदार जर तुम्हाला पाठिंबा देणारा, लग्नानंतरही काम करू देत असेल आणि तुम्हाला गृहिणी म्हणून ठेवत नसेल. तर अशी व्यक्ती जीवनसाथी बनण्यासाठी योग्य आहे.
एखाद्याला भेटण्यापूर्वी, लग्नाची चर्चा पुढे जाण्यापूर्वी किंवा निश्चित होण्यापूर्वी काही क्षण त्याच्याशी किंवा तिच्याशी एकटे बोला. दोन-तीन दिवस त्याला भेटा. त्याचे विचार आणि स्वत:चे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग तो मुलगा असो वा मुलगी. या बोलण्यातून तो आपल्याला साथ देईल की नाही याची थोडी कल्पना येऊ शकते. आयुष्याचा जोडीदार असा असावा जो एकमेकांचा आदर करतो आणि नात्याचे महत्त्व समजतो.
ज्या व्यक्तीचा नेहमीच स्वतःचा मार्ग असतो, प्रत्येक गोष्ट त्याला सहमती देतो, प्रत्येक गोष्टीत एकट्याने निर्णय घेतो, स्वतःला योग्य समजतो आणि समोरच्याला चूक समजत नाही. त्यापासून वेळीच विचार करणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य एखाद्यासोबत घालवायचे ठरवणार असाल तर तो तुमच्या आवडीनिवडी आणि नापसंतीत रस घेत आहे की नाही याचा विचार करावा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्न ही आयुष्यभराची बांधिलकी असते. यामध्ये दोन कुटुंबांचे नाते जुळते. या नात्यात माझ्या आणि तुझ्या नात्याला स्थान नाही, तर ‘आपले’ आणि ‘आम्ही’ या नात्याला महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत सुखी आणि निरोगी वैवाहिक जीवन जगण्यासाठी भावी जोडीदारामध्ये काही गुण असणे अत्यंत आवश्यक आहे.