पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या आरोग्याची वेळच्या वेळी काळजी घेतल्यास पुढील गंभीर आजार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी नाष्ट्याला बहुतांश घरात आपला जाणारा पदार्थ म्हणजे ब्रेड. मग तो व्हाईट किंवा ब्राऊनही असू शकतो. मात्र, हाच ब्रेड खरेदी करताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते.
कधीही ब्रेड खरेदी करताना त्यातील घटक नीट तपासून घ्या. तुम्ही ब्राऊन ब्रेड, व्हाईट ब्रेड किंवा मल्टिग्रेन ब्रेड खरेदी करत असाल तर पॅकेटवर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा. अनेकदा गव्हाच्या पिठाचा ब्रेड असे लिहिले असले तरी त्याला चविष्ट बनवण्यासाठी त्यात इतर गोष्टींचाही वापर केला जातो. त्यामुळेच ब्रेड खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटक नीट तपासून घ्या. जास्त प्रमाणात मीठ आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका ब्रेड स्लाइसमध्ये 100 ते 200 मिलीग्राम सोडियमपेक्षा जास्त नसावे. अशा परिस्थितीत मीठाचे एकूण प्रमाण किती आहे हे देखील तपासावं.
याशिवाय, एक्सपायरी डेट अर्थात वस्तू किंवा पदार्थ वापराची शेवटची तारीख. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट निश्चितपणे चेक करायला हवी. एक्सपायरी डेट ती वस्तू किती दिवस चालेल ते निश्चित करते. ब्रेड खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट चेक करून खरेदी करावे. त्याने फायदा होऊ शकतो.