पुणे प्राईम न्यूज डेस्क: सुट्ट्या सुरू झाल्या की अनेकजण कुठं ना कुठंतरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. पण तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करताय? अन् तेही गोव्याला? तर आम्ही तुम्हाला आता गोव्यातील अशा काही ठिकाणांविषयी माहिती सांगणार आहोत ते कदाचित काहींनाच माहिती असेल.
गोव्यातील पालोलेम बीच, अगोंडा बीच, बेनौलिम बीच याशिवाय बागा बीच, कलंगुट बीच हे प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. याशिवाय आग्वाद किल्ला, ‘बेसिलिका ऑफ बोम जिझस म्युझियम’, ओल्ड गोवा ही काही आकर्षणाची स्थळ आहेत. तसेच गोव्यातील चोरला घाट हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हे ठिकाण असून, फार कमी पर्यटकांना या ठिकाणीची माहिती असेल.
तुम्हाला जर शहरातील गोंधळ किंवा गोव्यातील गर्दीने भरलेल्या समुद्र किनाऱ्यांऐवजी शांत आणि तितक्याच सुंदर अशा वातावरणात वेळ घालवायचा असेल तर चोरला घाट इथं नक्की भेट द्या. गोव्यातील संकेलिम या एका सुंदर गावामध्ये असलेला अर्वलेम धबधबा डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. इथं जाताना तुम्ही गुगल मॅप्सचा आधार घेतल्यास रस्ता सापडण्यास जास्त अडचणीचे ठरणार नाही.