पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण सुंदर दिसावं असे महिलांसह पुरुषांनाही वाटत असतं. मग काहीना काहीतरी उपाय केले जातात. कधी टीव्ही, पेपरमध्ये येणाऱ्या जाहिराती पाहूनही सौंदर्य उत्पादनांची खरेदी केली जाते. मात्र, आता तुम्हाला घरच्या घरीच एक फेशिअल पॅक बनवता येईल. त्याचा रिझल्टही तुम्हाला चांगला दिसेल.
जर ग्लोईंग स्कीन हवी असेल तर बेसन लावणे फायदेशीर ठरते. पण नुसतं बेसन लावणं पुरेसे नसून, बेसन वापरण्याऐवजी बेसनाचे फेशियल करून वापरल्यास त्याचा तुमच्या त्वचेवर सकारात्मक परिणाम दिसू शकतो. बेसनाच्या पीठाने घरी फेशियल करून आपण त्वचा काही मिनिटांत चमकदार आणि सुंदर बनवू शकतो. फेशियल करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करावा. यासाठी एक चमचा बेसनमध्ये एक चमचा दही मिसळून चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा धुवावा, याचा फरक तुम्हाला जाणवण्यास सुरु होईल.
तसेच बेसन स्क्रबर हा देखील उत्तम पर्याय असू शकतो. या स्क्रबरच्या माध्यमातून त्वचेच्या मृत पेशी काढून चेहरा एक्सफोलिएट करण्याचे काम करते. यासाठी दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा ओट्स, दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा कच्चे दूध घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि गोलाकार पद्धतीनं स्क्रब करा आणि नंतर पाच मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा.