पुणे प्राईम न्यूज डेस्क: वर्षभरात एक-दोनदा तरी फिरायला जाण्याचा प्रयत्न करा. अशाने मन तर फ्रेश होतंच, पण नव्या जागा, ठिकाणांचीही माहिती मिळते. आपल्या भारतातही अशी अनेक पर्यटनस्थळे आहेत त्याची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. भारत सरकारकडून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक प्रयत्नही केले जातात.
भारतात अनेक प्रसिद्ध धार्मिक, नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळे आहेत. ज्यांची माहिती उपलब्ध झाल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळू शकेल. भारतातही अशी विविध पर्यटनस्थळे, फिरण्याच्या अनेक जागा आहेत, जेथे फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील व्यक्तीही आकर्षित होतात. त्यापैकी एक म्हणजे गोवा.
गोवा हे एक स्वतंत्र राज्य जरी असले तरी सर्वाधिक पर्यटकांची गोव्याला प्रचंड पसंती असते. गोवा हे भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक आहे. गोव्याला देशाचं ‘फन कॅपिटल’ही म्हणता येऊ शकतं. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील इतर, अनेक देशांतूनही अनेक पर्यटक येतात. याशिवाय, ताजमहल हे देखील एक सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे. आग्र्यातील ताजमहालला ‘युनेस्को’ने आपल्या हेरिटेजमध्ये स्थान दिले आहे. ताजमहाल पाहण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातूनही येत असतात.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य हे भारतात आहे. ते म्हणजे ताजमहालचे सौंदर्य, त्याची ख्याती ही जगभरात पसरलेली आहे. पांढऱ्या संगमरवराने बनलेल्या या ताजमहालचे परदेशी पर्यटकांना प्रचंड आकर्षण आहे. ताजमहाल व्यतिरिक्त, ताज संग्रहालय, इतिमाद-उद-दौला, अकबराचा मकबरा आणि आग्रा येथील लाल किल्ला ही प्रसिद्ध ठिकाणे आहेत.