पुणे प्राईम न्यूज डेस्क: अनेकदा तरूणाईच नवनव्या ट्रेंडनुसार फॅशन्स करताना दिसते. त्यानुसार, कपडे, सनग्लासेस इतकेच काय तर अनेक तऱ्हेच्या फॅशन्सचा अवलंब केला जातो. पण, काही लोक असेही आहेत ते वयाकडे न पाहता वय वाढलं तरी फॅशन्सकडे लक्ष देतात. त्यांच्यासाठी ही ट्रेंडिंग माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
वयोवृद्ध अर्थात ज्येष्ठांनी हुडिज् घालण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. हुडिज हे कॅज्युअल फॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे. हे फक्त दिसायलाच चांगलं दिसतं असं नाहीतर उबदार ठेवायचीही क्षमताही यात आहे. जर तुम्ही तुमच्या तरूणपणात हे वापरलं असेल तर वय झालं तरी वापरण्यात काही विशेष नाही. या हुडिज् सोबत स्वेटशर्ट घातल्यास व्यक्तिमत्त्व आणखीनच खुलण्याची शक्यता आहे. याशिवाय, रात्री झोपतानाही तुमचे कपडे सैल असतील याकडे लक्ष द्यावे. कारण, अंगाला चिकटलेले कपडे अर्थात फीट कपडे घातल्यास पुढील अडचणी येण्याची शक्यता असते. त्यामुळे हेदेखील पाहावे.
तसेच चामड्याचे जॅकेट हे फक्त तरूणांसाठी असते, असा समज करून अनेकदा वयस्कर लोक ते वापरण्यासाठी चालढकलपणा करतात. मात्र, जॅकेट हे सर्वच वयोगटातील व्यक्ती वापरू शकतात. त्याने तुमची शरीरयष्टी मजबूत तर दिसेलच शिवाय लूकही बदलून जाईल. जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही हे जॅकेट एक दिवसाआड वापरूही शकता.