पुणे प्राईम न्यूज डेस्क: जून-जुलै महिन्यात सामान्यत: उन्ह-पावसाचे वातावरण असते. त्यामुळे या बदलत्या वातावरणात फिरायला जाणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. तुम्ही देखील फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही ठिकाणांची माहिती सांगणार आहोत. तिथं गेल्यास मनामध्ये एक नवा उत्साह, नवचैतन्य निर्माण होऊ शकतं.
लेह-लडाख हे एक चांगले पर्यटनस्थळ आहे. जून महिन्यात लेह-लडाखचे हवामान थंड आणि आरामदायी असते. या महिन्यात येथील सरासरी तापमान 15 अंशांपेक्षा कमी असते. तर रात्री तापमान वाढते आणि ब्लँकेटशिवाय झोपणे कठीण होते. 40-45 अंश तापमानामुळे लोक त्रस्त असताना या उन्हात लेह लडाखमध्ये येणे हा एक चांगला निर्णय असू शकतो. तसेच तवांग हे देखील चांगलं पर्यटनस्थळ आहे. हे अरुणाचल प्रदेशातील एक अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. येथेही हवामान बहुतांशी थंड असते. या महिन्यात तवांगचे कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 9 अंश सेल्सिअस असते.
थंडीमुळे उन्हाळ्यातही लोक हलके उबदार कपडे घालताना दिसत आहेत. तुम्ही तुमच्या जोडीदार, कुटुंबीय किंवा मित्रांसह जून महिन्यात सुट्टीसाठी या हिल स्टेशनवर जाऊ शकता आणि थंड वाऱ्याचा आनंद घेऊ शकता. राजधानी दिल्लीसह अनेक राज्ये उष्णतेने त्रस्त आहेत, तर उत्तराखंडमधील अनेक भागात थंडी जाणवू लागली आहे.
या महिन्यात तुम्ही उत्तराखंडमधील हेमकुंडला भेट देऊ शकता, जेथे कमाल तापमान 9 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान उणे 1 अंश सेल्सिअस आहे.