पुणे: सर्वत्र सध्या लग्नाचा सिझन सुरु झाला आहे. आपल्या आजूबाजूला एखादं लग्नअसेल तर अनेकजण न निमंत्रण नसतानाही लग्नाला हजेरी लावतात. त्यांना नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी यांचे काही देणघेणं नसतं. अनेक जण लग्नात येतात जेवण करतात आणि निघून जातात. परंतु, तुम्हाही अशी चूक करत असाल तर तुम्ही आताच सावध झाले पाहिजे. कारण या चुकीमुळे तुम्हाला थेट दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. जर एखाद्या कार्यक्रमाचे निमंत्रण नसतानाही तुम्ही हजेरी लावली तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. गेल्या डिसेंबर महिन्यात लखनऊमध्ये लग्नाला न निमंत्रण नसतानाही गेल्यामुळे दोन जणांना अटक करण्यात आले होती.
लखनऊमध्ये एका लग्नात दोन जणांनी निमंत्रण नसतानाही हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पोटभर जेवणही केले अन् बिंदास्त डान्स देखील केला. त्यांचा डान्स पाहून लग्नातील काही लोकांना त्यांच्यावर संशय आला. काही जणांनी या दोघांना ताब्यात घेत पोलिसांना पाचारण केले. त्यांची सखोल विचारपूस केली असता ते लग्नातील दोन्ही बाजूकडच्या कोणाच्याच ओळखीतले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक त्यांची रवानगी करत थेट तुरुंगात केली.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, लग्नात निमंत्रण नसताना जेवल्याने तुम्हाला दोन ते सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? तर वकील उज्वल त्यागी यांनी सोशल मीडिया साइट इन्स्टाग्रामवर या प्रश्नाचे उत्तर दिले. जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमात निमंत्रण नसतानाही हजेरी लावत असाल तर हा गुन्हा आहे. तुमच्यावर भादवि कलम 442 आणि 452 अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यामध्ये दोन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. एखाद्या कार्यक्रमात न बोलवता जाणे ट्रेसपासिंगचा प्रकार आहे. त्यागी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.