पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपलं घर चांगलं आणि आकर्षक दिसावं यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यानुसार, घर सजवायला सर्वांनाच आवडते. मात्र, इंटेरिअर डेकोरेटर हे शब्द उच्चारले की डोळ्यासमोर अव्वाच्या सव्वा बजेट येते. पण अशा काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष दिल्यास बजेटमध्ये डेकोरेशन करता येऊ शकते.
घरातील बेडरूमच्या सजावटीसाठी ‘मिक्स अँड मॅच पॅटर्न’चा वापर करावा. पिलो, बेडशीट आणि लॅम्पशेड यांच्या डिझाईन्स मिक्स अटॅच्ड् अशा निवडा. थोडा रिलॅक्स असा फील येईल. कोणत्याही घराला फ्रेश लूक देण्यासाठी ‘एअरी, ब्राईट आणि लाईट’ या त्रिसूत्रीचा वापर करावा म्हणजेच घरात हवा खेळती राहू शकते. सेंटर टेबल, कॉफी टेबल यावर टेबल क्लॉथ, टेबल मॅट टाकत असाल तर तेच ते पाना-फुलांचे, फळांचे डिझाईन टाळून पॅटर्ड टेबलक्लॉथचा वापर करावा.
बाथरूममध्ये फ्लोअरवर नेहमीच क्रीम, पांढऱ्या रंगाच्या टाइल्स लावल्या जातात. परंतु त्याऐवजी आकाशी रंगाच्या टाईल्स लावून बघा, बाथरूम टवटवीत दिसायला लागेल. भरपूर उजेड राहावं याची खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठीच घरातील काही वस्तू, काही भिंती या फक्त प्युअर व्हाईट रंगात रंगवून घ्या.