पुणे प्राईम न्यूज डेस्क: ताजेतवाने दिसण्यासाठी चेहरा स्वच्छ ठेवण्याची गरज असते. पण चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काय, किती आणि कसं वापरायला पाहिजे हे माहिती असणंही गरजेचं आहे. चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, त्याची माहिती आपण जाणून घेऊ या.
चेहरा स्वच्छ आणि टवटवीत ठेवण्यासाठी फेसवॉश गरजेचे आहे. पण त्वचेच्या प्रकृतीनुरूप योग्य फेसवॉश वापरला पाहिजे. हर्बल फेसवॉश सर्वात उत्तम आहे. तरीही दिवसातून फक्त दोन वेळा फेसवॉश वापरावा. आपण मेकअप करत नसाल तर रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाण्यानेही चेहरा धुऊ शकता.
चेहरा धुवायची सोपी पद्धत
फेसवॉशने चेहरा धुताना पाणी जास्त गरम नसले पाहिजे, याने स्किन खराब होते. त्वचेसाठी जास्त गार पाणीही योग्य नाही म्हणून ताज्या किंवा कोमट पाण्याने चेहरा धुवायला हवा. चेहरा जास्त घासण्याने रंग गोरा दिसेल हा विचार चुकीचा आहे. असे करणे हानिकारक ठरू शकते. कारण अशाने त्वचेवरील नरम परत उतरते आणि स्किन कोरडी पडते.
तसेच ज्यांना फेस वाइप्स वापरण्याची सवय असते त्यांनीही दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा याचा वापर करू नये. ऑयली स्किनसाठी नीम, कोरफड, आणि मिंट फेसवाश योग्य पर्याय आहे. ड्राय स्किनसाठी केसर, मिल्क आणि हनी फेसवॉश वापरू शकता.