पुणे प्राईम न्यूज डेस्क: बदलत्या लाईफस्टाईलनुसार आपल्या राहणीमानातही बदल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग ते कपडे असो वा केसांची स्टाईल याकडे लक्ष दिले जाते. सध्या हेअर कलरिंग करण्याची फॅशन सुरु आहे. मात्र, हे करत असताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.
हेअर कलर स्प्रे हासुद्धा चांगला पर्याय आहे. या स्प्रेचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने केस रंगवता येतात. केसांच्या मुळांपासून स्प्रे करता येतो. लग्न किंवा एखाद्या समारंभासाठी केस रंगवायचे असतील तर हेअर स्प्रे वापरता येतात. कलरिंग केलेले केस खूप छान दिसतात. पण काही महिलांना केस तात्पुरते रंगवायचे असतात. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन वेळ आणि पैसे वाया घालवण्यापेक्षा वेगवेगळ्या पद्धतींनी केस कलरिंग करता येऊ शकतात.
घातक रसायनांपासून केसांचे रक्षण करायचे असेल तर तुम्ही व्हेजिटेबल डाय वापरू शकता. हा डाय बराच काळ टिकून राहतो. या डायमुळे केसांचे घरीच केस रंगवता येतील. केस रंगवण्याच्या नुकसान होत नाही. तसेच केस छान चमकदार दिसतात. केस हायलाईट करायचे असतील किंवा कमी दिवसांसाठी वेगळा रंग हवा असेल तर तुम्ही हेअर चॉक वापरू शकता. केस थोडेसे ओले करून हा चॉक वापरायचा असतो.