पुणे प्राईम न्यूज डेस्क: चटकदार, तेलकट, तिखट पदार्थांना अनेक खवय्यांची पसंती असते. पण हे खाताना काळजी घ्यावी लागते. बटाटा चिप्स, कँडी हॅम्बर्गर आणि फ्रेंच फ्राईजसारखे फास्ट-फूड पदार्थही बऱ्याचदा जंक फूडच्या कॅटेगरीत येतात. त्यामुळे ते खाणे टाकण्याचा सल्ला दिला जातो.
‘जंक फूड’च्या काही सामान्य उदाहरणांमध्ये सोडा आणि स्नॅक पदार्थांचा समावेश होतो. या ‘जंक फूड’मध्ये कॅलरीज असतात. मात्र, जास्त पोषक नसतात. ‘जंक फूड’ हे पदार्थ शरीराला उपयुक्त नाहीत, परंतु खावेसे वाटतात. ज्यात पोषक द्रव्ये नसतात किंवा अल्प प्रमाणात असतात. जंक फूडमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्यामानाने अतिशय कमी प्रमाणात असतात.
‘जंक फूड’ खाण्याचे प्रमाण जास्त असेल तर तुमचे मानसिक आरोग्य आपोआप कमी होऊ लागते. भूक लागल्यावर पौष्टिक पदार्थांऐवजी ‘जंक फूड’ खाण्यास प्राधान्य देत असाल तर ताणतणावांचा सामना करावा लागू शकतो. तसेच जे लोक जेवढे जास्त प्रमाणात ‘जंक फूड’चे सेवन करतात, तेवढा जास्त मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागू शकतो.
‘जंक फूड’ हे हाडांना देखील कमजोर बनवते. याचे कारण म्हणजे यामध्ये असणारे साखरेचे प्रमाण. या परिणामामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे स्तर वाढू लागतो. या जंक फूडमुळे आपल्या मेंदूची कार्यक्षमता आपण आहारामध्ये ज्या पदार्थांचा समावेश करतो त्यावर अवलंबून असते. ‘जंक फूड’चे सेवन करत असल्यास तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेमध्ये बदल होते.