पुणे प्राईम न्यूज : आपल्याला रोजच्या जेवणात तीच चव खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी काहीतरी चमचमीत आणि रुचकर जेवण खाण्याची इच्छा होते. अशावेळी आपल्या रोजच्या जेवणात जर अप्रतिम चव आणायची असेल तर काही टिप्सचा वापर करा. हॉटेलमधील काही पदार्थांची चव नेहमीच आपल्या जिभेवर रेंगाळत असते. पण तेच पदार्थ घरी बनवले तर ते रेस्टॉरंटसारखे बनत नाही.
अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ युटयूबवर बघून ट्राय करतात. पण त्याचीही चव हॉटेलातील पदार्थासारखी येत नाही. चला तर मग हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टीप्स आपणही फॉलो करुन रुचकर जेवण बनवू शकता.
या काही खास किचन टिप्स करा फॉलो…
-डाळ माखनी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी. ती कमीत कमी 7 ते 8 वेळा धुवून भिजत ठेवावीत. यानंतर ती डाळ न धुता शिजवा. त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते.
-छोटे- भटूरे करतेवेळी भटूरचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुस्करुन टाकावा. त्यामुळे भटूरे छान फुगतात आणि मऊ राहतात.
-मोठी भांडी गरम व्हायला वेळ लागतो आणि या भांड्यांमध्ये अन्न शिजायला वेळ लागतो. आता यावर उत्तम उपाय म्हणजे लहान भांडी वापरुन तुम्ही स्वयंपाक तयार करु शकता.
-दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देठ टाकावेत. त्यामुळे दही घट्ट लागते. मिरचीच्या देठात enzymes नावाचा घटक असतो. त्यामुळे दही घट्ट होते.
-काही भाज्या अशा असतात ज्या शिजायला खूप वेळ लागतो. बटाटे आणि टोमॅटो सारख्या गोष्टी लवकर शिजवल्या जाऊ शकतात. परंतु सोयाबीन, कोबी, शिमला मिरची आणि दुधी या भाज्यांना वेळ लागतो. यासाठी त्यांना काही वेळ गरम पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाण्यातून काढून तेलात टाकून तळून घ्या. याच्या मदतीने तुम्ही काही मिनिटांत भाज्या शिजवू शकाल.
-जर तुम्हाला लसूण आणि आले कोणत्याही त्रासाशिवाय ठेचून घ्यायचे असेल तर एका खलबत्त्यात लसूण, आले आणि चिमूटभर मीठ घालून बारीक करा. याच्या मदतीने तुम्ही लसूण आणि आल्याची एकसमान पेस्ट मिळवू शकता.
-हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो. अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो. त्यामुळे या भाज्या शिजवताना एक टिस्पून खाण्याचा सोडा टाकावा. त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो. तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये.
-शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात. एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा. त्यामुळे चांगली चव येते.