दसरा झाल्यानंतर आता दिवाळी काही दिवसांवर येत आहे. त्यानुसार, घराची स्वच्छता, साफसफाई केली जाते. वास्तुशास्त्रानुसार, काही नियमांची काळजी घेतल्यास तुमचे घर स्वच्छ तर राहतेच शिवाय ते सकारात्मक उर्जेनेही भरले जाते. या दिवाळीत, तुमचे घर सजवताना आणि स्वच्छ करताना सकारात्मकता भावना ठेवल्यास फायद्याचे ठरू शकते.
घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी प्रथम खोली स्वच्छ करा. दारे आणि खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून सूर्यप्रकाश आणि ताजेपणा आत येऊ शकेल. सूर्यकिरण नकारात्मक ऊर्जा दूर करतात. तुमच्या घरात वडीलधाऱ्यांच्या आठवणी किंवा वस्तू असतील तर त्या स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा. अशा वस्तू विशिष्ट ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुमच्या कुटुंबात एकता आणि प्रेमाची भावना कायम राहील.
घराच्या मुख्य दरवाजाच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करायला विसरू नका. हे सकारात्मकतेचे केंद्र मानले जाते. येथे कोणताही कचरा किंवा जुन्या वस्तू असू नयेत. मुख्य दरवाजावर रांगोळी काढायला विसरू नका. तसेच साफसफाईनंतर घर सजवण्यासाठी पांढरा, हलका पिवळा किंवा हिरवा असे हलके आणि चमकदार रंग वापरा. हे रंग सकारात्मकता वाढवतात आणि मन प्रसन्न करतात.