त्वचा ही आपल्या नाजूक अंगापैकी एक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे आता महत्त्वाचे झाले आहे. त्यानुसार, मार्केटमध्ये विविध प्रकारची उत्पादनेही आली आहेत, तितकेच लक्ष ओठांकडेही देणे गरजेचे आहे. ओठांच्या आरोग्यासाठी लिप बाम लावणारेही अनेक लोक आहेत. लिप बाम चांगला असावा यासाठी काही लोक तर पैशांचीही चिंता करत नाहीत. मात्र, लिप बाम घेण्यापूर्वी काही गोष्टींची माहिती घेणे महत्त्वाचे ठरते. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आता देणार आहोत.
लिप बाम खरेदी करण्यापूर्वी ते नैसर्गिक आहे की नाही, ते ओठांचे रंगद्रव्य कमी करते की नाही किंवा लिप बाममध्ये कोणतेही कृत्रिम रंग किंवा रसायन वापरले गेले आहे का यांसारख्या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. परंतु, या सर्व गोष्टींची माहिती सर्वांनाच असते असे नाही. मात्र, ओठांच्या काळजीसाठी एक घरगुती उपाय देखील सांगितला आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे ओठ टवटवीत बनवू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा साखर पावडर (पिठी साखर), चिमूटभर हळद आणि एक चमचा दही घेऊन ते मिक्स करावे लागेल. तयार केलेली पेस्ट तुमच्या ओठांवर 10 मिनिटे लावा आणि नंतर स्वच्छ करा.
जर तुम्हाला लिप बाम लावायचा असेल तर कोजिक ॲसिड, अल्फा आर्बुटिन आणि व्हिटॅमिन सी असलेले लिप बाम निवडा. हे सर्व घटक रंगद्रव्य हलके करण्यास, मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करण्यास आणि ओठांना नैसर्गिक गुलाबी चमक देण्यास मदत करतात. याने तुम्हाला समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.