बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्या पालनपोषणावर विशेष भर दिला जातो. पण हे करत असताना सर्वात आधी म्हणजे बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याचं नाव काय ठेवायचं अशा प्रश्नात अनेक पालक अडकतात. पण, तुमचंही बाळ सप्टेंबर महिन्यात जन्मलं असेल तर आम्ही तुम्हाला काही नावांची माहिती सांगणार आहोत.
प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचे नाव विशेष आणि प्रभावी ठेवायचे असते. नाव मुलाची ओळख आणि व्यक्तिमत्व पुढे करते. अशा परिस्थितीत पालक मुलाचे नाव ठेवताना खूप विचार करतात. पण अशी काही नावं आहेत ते युनिक तर वाटतातच शिवाय चांगला अर्थही निघतो. ऋतुराज हे नावदेखील विशेष असं ठरू शकतं. मुलगा असेल तर ऋतू आणि मुलगी असेल तर रितू हे नाव योग्य ठरू शकतं. पण जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव हवामानानुसार ठेवायचे असेल तर ऋतुराज हे चांगले नाव असू शकते.
सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलाचे नाव अयांश ठेवता येऊ शकते. अयांश म्हणजे पालकांचा भाग. पितृपक्षही याच महिन्यात येतो. ज्यामध्ये मुलगा किंवा नातू पिंड दान करून आपल्या माता-पित्यांना किंवा पूर्वजांना मोक्ष देतात. अशा स्थितीत हे नाव तुमच्या मुलासाठी चांगले ठरू शकते.
निर्वेद हे नाव देखील ठेऊ शकता. या नावाचा अर्थही खूप सुंदर आहे. निर्वेद म्हणजे ‘देवाची देणगी’. तुमचा मुलगा ही देवाने तुम्हाला दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे. अशा स्थितीत पुत्राचे नाव निर्वेद ठेवता येऊ शकते.