पुणे प्राईम न्यूज डेस्क: आधुनिक जीवनशैलीसोबत घर आणि स्वयंपाकघरही सध्या अपडेट होऊ लागले आहे. गॅसच्या तुलनेत सुरक्षित आणि सोपा पर्याय म्हणून इंडक्शन शेगडी वापरण्यास सुरुवात झाली आहे. या इंडक्शन शेगडीमुळे स्वयंपाक पटकन होतो आणि अन्न शिजवताना जास्त त्रासही नसतो.
इंडक्शन शेगडी सुरू असताना किचनमध्ये फॅन, एसी सुरू ठेवू शकता. इंडक्शन शेगडी ही स्वच्छ करणेही खूप सोपे झाले आहे. इंडक्शन शेगडी वीजेवर चालणारे उपकरण आहे. त्यामुळे जर तुम्ही ते नीट वापरले नाही तर ती लवकर खराब होऊ शकते. स्वयंपाक झाल्यावर शेगडी नियमित स्वच्छ करायला हवी. विशेष म्हणजे इंडक्शन शेगडी स्वच्छ करणे अतिशय सोपे काम आहे. साध्या ओल्या फडक्यानेही तुम्ही इंडक्शन शेगडी स्वच्छ करू शकता.
जर तुम्ही योग्य प्रकारची भांडी या शेगडीवर वापरली नाही तर तुम्हाला स्वयंपाक करताना नक्कीच अडचणी येऊ शकतात. इंडक्शन शेगडी वापरताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे इंडक्शनवर तुम्ही कोणती भांडी वापरत आहात. इंडक्शन शेगडीसाठी आजकाल बाजारात सर्व प्रकारचे इंडक्शन कुकवेअर विकत मिळतात. तसेच ही इंडक्शन शेगडी देखील जास्त महाग नसते. तुम्हाला ही शेगडी २ ते ३ हजार रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.