Independence Day 2024 : स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची तयारी अनेक दिवस अगोदरच सुरू होते, कारण स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हटलं की अर्थातच पांढरी कुर्ती, पांढरा पायजमा आणि तिरंगी ओढणी ही फॅशन आपल्या डोळ्यासमोर येते.
देशभक्ती दाखवण्यासाठी तुम्ही तिरंग्यातील रंगांच्या मदतीने कपडे घालू शकता. चला तर मग आज बघूया स्वातंत्र्यदिनी तिरंगा सलवार-सूट, साड्या आणि कुर्त्यांच्या नवीन डिझाईन्स पाहुयात तसेच, स्टायलिश दिसण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेऊयात.
– आपल्या सर्वांना साडी नेसायला आवडते. 15 ऑगस्ट रोजी तुम्ही प्रिंटेड किंवा तिरंग्याच्या रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसू शकता. त्याच वेळी, तुम्ही साध्या कॉटन साडीच्या बॉर्डरसाठी 3 रंगीत रिबन्स देखील खरेदी करू शकता आणि तुमच्या आवडीनुसार कस्टमाइझ लूकमध्ये घालू शकता. ब्लाउजसाठी तुम्ही हिरवा किंवा केशरी रंग निवडू शकता.
– स्वातंत्र्यदिनी तुम्ही ट्राय कलर सूट घालू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पांढरा कुर्ता घालावा लागेल. यासोबत तुम्हाला हिरव्या रंगाचा पायजमा आणि केशरी रंगाचा स्कार्फ सोबत ठेवावा लागेल. हे तुम्हाला वेगळे राहण्यास मदत करेल. तुम्ही तुमच्या पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत केशरी रंगाचे नेहरू जॅकेट कॅरी करू शकता. ते अगदी क्लासी दिसते.
– स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपला जसा वेष परिधान केला असेल त्यावर कोल्हापुरी चप्पलचा साज तुम्ही चढवू शकता. पारंपरिक अथवा आधुनिक कोणत्याही वेषावर कोल्हापुरी चप्पल अधिक शोभून दिसते. विशेषतः पंजाबी ड्रेस, कुरती असा वेष असेल तर तुमच्या या वेषावर नक्कीच कोल्हापुर चप्पल अधिक उठावदार दिसते.
– तुम्ही कोणता वेष परिधान केला आहे त्यानुसार तुम्ही केशरी, हिरव्या आणि निळ्या बांगड्यांचा चुडा तयार करून पंजाबी ड्रेससह तो घालू शकता. तुमच्या हातावर नक्कीच हा चुडा अप्रतिम दिसतो. तसंच तुम्ही घातलेल्या पांढऱ्या ड्रेसच्या कॉम्बिनेशननुसारच तुम्ही कानातले परिधान करा. हिरवी ओढणी घेतल्यास तुम्ही गोल्डन हिरवे झुमके घातले तर अधिक सुंदर दिसतात. नुसता कुरता पायजमा असेल तर त्यावर केशरी गोल्डन मोठे कानातले अधिक उठावदार दिसतील.
– लाँग स्लिट कुर्ता देखील खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालू शकता. यासोबत ग्रीन ट्राउजर छान दिसते. त्याचबरोबर निळ्या रंगाचा लाँग स्लिट कुर्ता आणि व्हाइट ट्राउजर किंवा पँट टीमअप करून तुम्ही कंप्लीट लूक मिळवू शकता. तुम्ही यासोबत ट्राय कलर ज्वेलरी सुद्धा कॅरी करू शकता.