LifeStyle : आपल्या अन्नपदार्थात हमखास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मीठ. मीठ हे अन्नपदार्थ रूचकर बनवण्याचे काम करते. पण याच मिठाचे प्रमाण योग्य असल्यास आरोग्याची कोणतीही समस्या जाणवू शकत नाही. मात्र, प्रमाण जास्त असल्यास समस्या उद्भवू शकते. त्यासाठी नियमित मिठासह इतर काही पर्याय देखील आहेत.
जर तुम्ही जास्त प्रमाणात मिठाचा समावेश केला तर तुम्हाला रक्तदाबाची समस्या जाणवू शकते. त्यासाठी पर्याय म्हणून रॉक सॉल्ट अर्थात सैंधव मीठ योग्य ठरू शकते. हे मीठ सिंध प्रदेशातील हिमालयातून आणले जाते. त्यामुळेच या मिठाला हिमालय, रॉक सॉल्ट देखील म्हटले जाते. जेवणामध्ये रॉक सॉल्टचा वापर केल्यास छातीत जळजळ, बद्धकोष्ठता, सूज इत्यादी समस्या उद्भवण्याचे कमी करते.
समुद्री मीठ किंवा पांढरे मीठ जेवण बनवण्यासाठी वापरले जाते. जेवणात वापरले जाणारे हे मीठ बारीक असते. समुद्राच्या पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याचे बाष्पीभवन होते. त्यानंतर त्याचे रूपांतर मिठामध्ये होते. प्रक्रिया करण्याआधी मीठ तपकिरी रंगाचे असते. हे मीठ देखील आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.