Pune Prime News Desk : आपल्या निसर्गात अनेक फळे, भाजीपाला, वनस्पती आहेत त्याचे फायदेही बरेचसे आहेत. त्यात गाजर हे देखील आरोग्यासाठी चांगले मानले जाते. गाजरामध्ये अनेक पोषकतत्व असतात. गाजर खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढतेच शिवाय हृदयरोगावरही फायदेशीर मानले जाते. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात उब राहते.
गाजरात कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन सी, ए असतं. त्यानं हृदयरोगावरही मात करता येते. थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो. गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह असतं. त्यानं अॅनिमिया दूर होतो. गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गाजरानं पचनशक्ती सुधारते. गाजरात बिटा कॅरेटिन असतं. ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं.
गाजरात जीवनसत्व अ असतं. रोज एक गाजर खाल्ल्यानं चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते. तसंच डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. गाजर कच्चं खावं. त्यानं जास्त फायदा होतो. गाजरामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे तुम्ही रोज एक गाजर बिनधास्त खाऊ शकता.