सूर्याचे दर्शन होणं ही सामान्य बाब वाटत असली तरी भारतात असे एक ठिकाण आहे तेथे सर्वात आधी सूर्याचे दर्शन होतं. इतकंच नाहीतर आजच्या धकाधकीच्या जीवनात आराम आणि निवांत जाऊन तिथं राहता येऊ शकतं. होय, आम्ही भारताच्या ईशान्येकडील राज्य अरुणाचल प्रदेशबद्दल बोलत आहोत.
अरुणाचल प्रदेशातील एका खेड्यात सूर्य प्रथम उगवतो (भारतातील पहिला सूर्योदय). भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य असण्याव्यतिरिक्त, अरुणाचल प्रदेश देखील मेरिडियन रेषेच्या अगदी जवळ आहे. यामुळेच भारताच्या इतर भागात अंधार असताना येथील डोंग गावात सूर्य उगवला आहे. तवांग जिल्ह्यात असलेले डोंग गाव हे भारतातील अशा काही ठिकाणांपैकी एक आहे जिथे देशात सर्वप्रथम सूर्योदय होतो. या सुंदर गावाला ‘भारताचे पहिले सूर्योदय ठिकाण’ म्हटले जाते.
निसर्गाचे हे विलक्षण सौंदर्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे म्हणून सूर्योदय प्रेमी येथे लांबून येतात. डोंग गावात सूर्योदय झाला की संपूर्ण वातावरण बदलून जाते. आकाश हळूहळू तांबूस होते आणि नंतर हळूहळू सूर्याची पहिली किरणे दिसू लागतात. हे दृश्य इतके मनमोहक आहे की डोळ्याचे पारणे फेडण्यासारखेच आहे.