पुणे प्राईम न्यूज : सणवार म्हटलं की घरातील स्वच्छता ही आलीच. दसरा आणि दिवाळी या मोठ्या सणांना आपण सुरवातीला घराची साफसफाई करुन घराची सजावट केली जाते. आपल्या घरात एखादा सण आहे, याचं फिलिंग घर सजविल्याशिवाय येतच नाही. पण बरेचदा वेळ कमी असताना आपण गोंधळून जातो, काय सजावट करावी, कशी करावी आपल्याला लवकर समजत नाही. चला तर मग घर सजवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो कराल तर 15 मिनिटात घराचं रुप बदलेल.
रांगोळी: दारात रांगोळी काढा. सणासुदीच्या दिवसांत तर रांगोळी काढायलाच हवी. फुलांचा, रंगांचा वापर करून तुम्ही दारात रांगोळी काढू शकता. यात तुम्ही वेगवेगळ्या डिझाइन बनवू शकता. रांगोळीच्या डिझाइन इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहेत.
फुलांची सजावट: घर सजवताना तुम्ही फुलांनी सजवू शकता. फुलांची रांगोळी काढू शकता, फुलांच्या माळा भिंतीवर लावू शकता. पायऱ्यांवर फुलं टाकू शकता. फुलांचा सुगंध घरात प्रसन्नता ठेवतो. फुलांनी सजवलेलं घर उत्तम!
घरातील कोपरे : आपल्या हॉलमध्ये चार कोपरे तर असतातच. या कोप-यात दिवाण, सोफा असं मोठं सामान ठेवलेलं असेल तर ते राहू द्या. पण त्या व्यतिरिक्त इतर जे कोपरे आहेत, तिथेही एखादं शो पीस ठेवून तो कॉर्नर मस्तपैकी डेकोरेट करता येतो.