How To Know Dog Has Rabies : रेबीज हा जेवढा घातक आजार आहे, तेवढाच जीवघेणाही आहे. साधारणतः आपल्या सर्वांना माहिती आहे की, कुत्रा चावल्यानं रेबीज होतो. रेबीज हा न्यूरोट्रॉपिक लिसावायरस किंवा रॅबडोविरिडे नावाच्या विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे. रेबीजवर कायमस्वरूपी उपचार नाही. मात्र वेळीच निदान झाल्यास लशीकरणाने रेबीजवर नियंत्रण मिळवता येतं. पण जर एखाद्या व्यक्तीला लस मिळाली नसेल तर अशा परिस्थितीत रेबीजचा संसर्ग वाढू शकतो आणि हा संसर्ग हळूहळू जीवघेणा देखील ठरू शकतो. दरम्यान, कुत्रा चावल्यानंतर किती वेळात रेबीजचं इंजेक्शन घ्याव लागतं? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कुत्र्याला रेबीज झाल्याची लक्षणं
तुमच्या घरात कुत्रा असेल किंवा एखाद्या भटक्या कुत्र्याला रेबीज झाला आहे हे तुम्ही कसं ओळखाल? जाणून घ्या
- कुत्रा अधिक चिडचिडा होतो
- विनाकारण कुत्रा इथे तिथे भटकतो किंवा पळत राहतो
- कुत्र्याच्या तोंडातून लाळ येत राहते
- कुत्रा सुस्तावतो आणि एका वेळेनंतर त्याचा मृत्यू होतो
कुत्रा चावल्यानंतर कधी आणि किती लसी घेणं आवश्यक?
कुत्रा चावल्यास दोन प्रकारच्या लस दिल्या जातात. पीडित व्यक्तीला तीन इंजेक्शन्स घ्यावे लागतात. त्यातील पहिलं इंजेक्शन कुत्रा चावल्यानंतर लगेच घेतलं जातं. तर दुसरं इंजेक्शन तीन दिवसांनी आणि तिसरं इंजेक्शन सात दिवसांनी घेतलं जातं.
रेबीज झालेल्या व्यक्तीमध्ये लक्षणं
रेबीज हा आजार झाल्यानंतर तुम्हाला शरीरात तीव्र वेदना जाणवू लागतात. याबरोबरच संपूर्ण शरीरात थकवा जाणवू लागतो आणि तुम्हाला ताप येऊ लागतो. जेव्हा ही स्थिती अधिक गंभीर होते, तेव्हा रुग्ण हवा आणि पाण्याला घाबरतो आणि नेहमी अंधारात राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच तो विचित्र आवाज देखील काढू लागतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. पुणे प्राइम न्युज यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)