पावसाळ्यात स्वत:सह आपल्या शरीराचीही काळजी घेणे गरजेचे बनते. त्यात सारखं-सारखं पाण्यात राहिल्याने पायाचा मुलायमपणा जात असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. पण हा मुलायमपणा परत आणता येऊ शकतो तोही घरगुती क्रीमच्या माध्यमातून. मात्र, या क्रीम कोणत्या आहेत, याचीच आपण आज माहिती घेणार आहोत.
खोबरेल तेल आणि शिया बटर क्रीम हे मुलायम पायांसाठी फायद्याचे ठरू शकते. ही क्रीम बनवण्यासाठी 2 टेबल स्पून खोबरेल तेल, 2 टेबल स्पून शिया बटर, 1 टेबल स्पून ऑलिव्ह ऑईल गरम करून एकत्र मिक्स करा. आता आवश्यक तेवढे तेलाचे काही थेंब घ्या आणि सर्वकाही चांगले मिसळा. आता एका बॉक्समध्ये बंद करून ठेवा. तुम्ही ते रोज वापरू शकता. मध आणि ओट्स क्रीम कसे बनवायचे तर हे तयार करण्यासाठी प्रथम बदामाचे तेल 2 चमचे मधात मिसळा. आता त्यात ग्राउंड ओट्स मिक्स करा आणि एका बॉक्समध्ये बंद करा. या क्रीमने तुम्ही दररोज पायांची मालिश करू शकता.
दही आणि हळद क्रीम हे देखील प्रभावी ठरू शकते. तुमच्या घरात दही नक्कीच मिळेल. क्रीम तयार करण्यासाठी, 2 चमचे दही, 1/2 चमचे हळद आणि 1 चमचे गुलाबजल चांगले मिसळा. आता पायांवर वापरा. काही वेळाने पाय पाण्याने धुवा. यामुळे ओलावा येईल आणि पायाला चमक येईल.