काही नाती काळानुसार सुधारतात तर कधी कधी नाती दिवसेंदिवस तुटण्याच्या टोकाला पोहोचतात. जर तुम्हाला अचानक कळले की तुमचा प्रियकर अर्थात बॉयफ्रेंड तुमच्याशी ब्रेकअप करू इच्छित आहे, तर धक्का बसू शकतो. त्यामुळे अशी काही लक्षणे आहेत ती त्यामध्ये दिसल्यास लवकरच ब्रेकअप होईल, असे समजून जा.
आपण ज्यावर प्रेम करतो त्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व असते. जर तुम्ही एखाद्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असाल, परंतु तो तुम्हाला महत्त्व देत नाही आणि तो तुमच्या प्लॅनिंगपासून दूर हटण्याचे कारण बनवत असेल तर काळजी घ्या. अनेकवेळा फोन करूनही तुम्ही आला नाही आणि वेळ वाया न घालवता दुसरा कोणी तिथे पोहोचला, तर त्याचा तुमच्यातील रस कमी झाला आहे, हेदेखील समजून जावे.
जर तुमचा बॉयफ्रेंड तुमच्याशी संबंध तोडू इच्छित असेल तर, पहिली आणि सुरुवातीची पायरी म्हणजे संवादाचा अभाव. तासनतास चॅटिंग आणि कॉल्सवर बोलणारी एखादी व्यक्ती अचानक तुमच्या कॉलला उत्तर देणं बंद करत असेल किंवा तुमच्या मेसेजला प्रतिसाद देत नसेल, तर तो तुमच्याशी ब्रेकअप करण्याचा विचार करत असण्याची शक्यता आहे.