आपले केस हे काळेभोर असावेत असे अनेकांना वाटत असते. पांढरे होऊ नयेत, यासाठी काही उपायही केले जातात. वाढत्या वयाबरोबर केस पांढरे होणे ही एक सामान्य बाब आहे. मात्र, जर तुमचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले तर ही नक्कीच चिंतेची बाब आहे. जर तुम्हालाही कमी वयात केस पांढरे होण्याची काळजी वाटत असेल तर काही घरगुती उपाय करून ते टाळता येऊ शकते.
जर तुमचे केस कमी वयातच पांढरे होत असतील तर आवळा आणि जास्वंदाची फुले तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. ते वापरण्यासाठी आवळा, जास्वंदाची फुले आणि तीळ यांची पेस्ट बनवा. ज्यामध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब टाका आणि स्कॅल्पला मसाज करा. असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल. केस झपाट्याने पांढरे होणे थांबू लागेल. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठीही कांदा खूप गुणकारी आहे. यासाठी सर्वप्रथम कांद्याचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या आणि नंतर ते पिळून घ्या आणि त्याच्या रसाने टाळूची मालिश करा. आठवड्यातून किमान दोनदा असे केल्यास तुम्हाला खूप फायदे होतील.
तसेच केसांचे पांढरे होणे दूर करण्यासाठी मेहंदी आणि मेथीची पेस्ट देखील खूप प्रभावी ठरू शकते. त्यासाठी सर्वप्रथम, मेहंदी आणि मेथीची पेस्ट तयार करा, नंतर त्यात थोडेसे बटर मिल्क आणि खोबरेल तेल घाला. याने केसांना मसाज करा. हे मिश्रण खूप फायदेशीर ठरेल. हे सर्व उपाय करताना हेअर एक्सपर्टचा सल्लाही अवश्य घ्या.