पुणे प्राईम न्यूज : सणासुदीच्या दिवसांत आणि विशेष कार्यक्रमांमध्ये सिल्कच्या साड्या ट्रेडिशनल लुक देतात आणि आपलं सौंदर्य वाढवतात. अशावेळी टिपिकल लूक न करता आहे त्यातच थोडे वेगळे काही केले तर आपण सगळ्यांमध्ये मस्त उठून दिसतो. चला तर मग गणपती गौरीच्या सणाला पारंपारिक साड्या नेसून हटके लूक करुया.
पेशवाई साडी
– ही साडी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तयार केली जाते. या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असून या साडीला पेशवाई साडी असं नाव देण्यात आलं आहे. पेशव्यांच्या काळात अश्या पद्धतीची साड्यांचा वापर केला जायचा.
पैठणी साडी
– साडींची महाराणी म्हणून ज्याची ओळख आहे ती साडी म्हणजे पैठणी. प्रत्येक महिलेकडे एकतरी पैठणी असतेच. पैठणीचा काठ किंवा त्याचा प्रकार हा कितीही कॉमन झाला तरी देखील तो एव्हरग्रीन असा पर्याय आहे. येवल्याची ओळख असलेल्या या साडीचे हल्ली अनेक प्रकार मिळतात.
बनारसी साडी
– बनारसी साडी बनारस आणि त्याच्या आसपासच्या शहरामध्ये बनवली जाते. प्राचीन काळामध्ये या साडीमध्ये सोन्याची किंवा चांदीची तार लावली जायची. परंतु आता या साडीमध्ये कृत्रिम तारांचा वापर केला जातो. भारतातील काही ठिकाणी लग्न समारंभामध्ये बनारसी साडी आवडने नेसली जाते.
बांधणी साडी
– बांधणी साडीला बंधेज साडीच्या नावाने देखील ओळखले जाते. ही साडी गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार केली जाते. ही साडी विविध रंगांमध्ये असते. ही महिलांमध्ये खूप लोकप्रिय साडी आहे.
कांजीवरम साडी
– तामिळनाडूमधील कांचिपुरम राज्यातील या साडीला कांचिपुरम साडी किंवा कांजिवरम साडी म्हणून ओळख आहे. तामिळनाडूमध्ये खास लग्नकार्यासाठी ही साडी आवर्जून नेसली जाते. त्यामुळेच या ठिकाणी साडीचा हा प्रकार खूपच जास्त प्रचलित आहे. याशिवाय केरळ, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील ही साडी नेसली जाते.
साऊथ इंडियन
– मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी. या साड्यांचा वापर दक्षिण भारतात केला जातो. मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात.
टसर सिल्क
– टसर सिल्क साड्या त्यांच्या विशिष्ट डिझाईन्ससह हलक्या आणि लक्षवेधी असतात. त्यातील बारकावे प्रेक्षकांना आकर्षित करतात यात शंका नाही.